पलायनवाद आणि वृद्धत्त्व

दिवेलावणीची वेळ झालीये…😃 अहो…गोरज मुहूर्ताला आरंभ झालाय म्हणून म्हटलं…😃 तुम्ही नेमक काय विचार केला असणार याची मला कल्पना नसावी…???? 😃 नाहीये हो खरच..😛 (खतरनाक गुगली वाटला?)….सहजच विचारलं होतं !!! 😃 आय नो..की…यू हेट एस्केपिझम…आणि एस्केपिझम इज नॉट दी सोल्यूशन..असं असताना तुम्ही डाएट आणि व्यायामापासून सोयीस्कररीत्या पळ काढता असं म्हणून मी अपराध करायला धजावणार नाही…आता संध्याकाळी दिवे लावा…कळलं???😛😃😛

गाणं शिकायला जरा गायकी गळा असावाच लागतो…मान्य, वक्तृत्त्व उपजतच असावं लागतं…कुबूल है…तसं… डाएट आणि व्यायामाचं नाही…त्याची आवड उत्पन्न करावीच लागते… ती ज्यांची होत नाही त्याला पलायनवादच कारणीभूत असतो…असे पलायनवादी तारुण्यापासूनही पटकन पळून पटकन वृद्ध होतात….😃 (आला का मजा…???)…मग भोगत बसतात शारिरीक सजा….

मी परत परत सांगतोय…(बोल बाबा बोल..😃)… वृद्धत्त्व आणि आजारपण हे मानवाचे शापच मानावे….त्यावर मात करता येते…त्यासाठी पलायनवादी वृत्ती झटकावी लागते…ती तुमच्यात नाहीये..आय नो…!!

व्यायाम आणि डाएट जेव्हा बहुसंख्य सुरु करतील…😃 तेव्हाच मी सदर विषयातील डीप डायव्हिंग सुरु करणार आहे…तोपर्यंत फटकेच मारायचं ठरवलय शब्दांचे हो…कारण शहाण्याला….😃😃😛

बाकी ठिक?? …आता शरीरोपासना सुरु करा…बाकी नंतर….😃

शुभेच्छा
💐💐💐

– सुमेध

लपवालपवी

बचना मेरे यारो…

लो मैं आ गया….😃

माझ्या येण्यानं आपला भ्रमनिरास झाला असेल…तरी मी माफी मागेन तुमची असं वाटतय….?😃 नो न् नेव्हर…सिन्स आय लव्ह यू…(एकतर्फी आहे…आय नो…तरीही..😃). कसे आहात ?? व्यायाम आणि डाएट सुरु आहे प्रत्यक्षात की फक्त विचारांच्या पातळीवरच मर्यादित आहे…??? ( हे ही नसे थोडके….😃). वार्धक्य रोखण्याचा तो एक आणि एकमेव राजमार्ग आहे….

जो वार्धक्य टाळतो… तो….अॉफकोर्स…. आजारी पडण्याच्या शक्यतेपासूनच कैक योजनं दूर असतो…..👍 (खतरनाक आहे रे हे….😃…)…येस हे खरं आहे. वार्धक्याची निशाणी शरीराच्या बाहयभागावर उमटण्याआधी… ती शरीराच्या आतून वर येते…तिचा मार्ग आतून वर असतो….😃 (डेंजर….)…ह्याचं भान असणं याचाच अर्थ डोळे उघडले की सकाळ असा होतो…अशा सोनेरी सकाळी…एक तर वार्धक्य टाळण्याचे प्रयत्न सुरु होतात …वा… रोखण्याचे..!! तुम्ही नेमकं काय करताय ते ठरवा.😃

केवळ वय किंवा वार्धक्य लपवण्यासाठी पुरुषांनी टी शर्ट घालू नये किंवा मिशा कापू नयेत. बायकांनी केवळ तेवढ्यासाठीच पंजाबी ड्रेस वा जिन्सचा आधार घेऊ नये. एक अकृत्रिम स्टाईल केवळ आणि केवळ स्टाईलसाठीच मारावी. लपवालपवीसाठी त्याचा उपयोग करु नये..😃 वय आणि वार्धक्याच्या लपवालपवीचं भान विकसित करण्याऐवजी डाएट आणि व्यायाम करावेत.

योग्यवेळी सुरु केलेल्या सातत्यपूर्ण डाएट आणि व्यायामानेच तारुण्य अबाधित राहील…मग काय ईश्टाईलच ईश्टाईल….पण सोपं नव्हे हे….😃😃

बाकी ठिक?? तारुण्याची आराधना सुरु करा…ताबडतोब !!!

शुभेच्छा

💐💐💐

– सुमेध

सोपं काय आहे?

काय मंडळी? बरं चाललय ना…😃 की नकोsss झालय?? 😃😃 …नाही ना?? मग सांगा पाहू…केलात का व्यायाम ?? करताय ना डाएट?? 😃 मी हा प्रश्न तुम्हाला लै वेळा विचारणार…कारण मी तुमच्यावर प्रेम करतो.. कोई शक? 😃 मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा नाहीये…!! ते मला माहितीये … येस !! माहितीये…!!!😃😃

व्यायाम आणि डाएट यावर चर्चा करणं, त्यावर काही तात्त्विक विवेचन करुन प्रचंड खल करण्यात उत्सुक असलेले माझे काही मित्र-मैत्रिणी आहेत…ते चर्चेत खूपच वाकबगार आहेत पण अंगापिंडानं लैच बाळसेदार😃…मी त्यांना शंभर वेळा सांगितलं… चर्चा बस्स करा… प्रत्यक्ष कृती करा .माझा आवेश 😃 बघून बिचारे करतात काहीतरी…पण तेरड्याचे रंग तीन दिवसही टिकत नाहीत….😃

शारिरीक व्यथा आणि आजारपण मानवी जीवनमान आकुंचित करते. हातात बक्कळ पैका आहे..पण तो डॉक्टरांच्या तिजोरीत नेमाने भरणारे बरेच महाभाग माझ्या पाहणीत आहेत. व्यायाम आणि डाएट फॉलो करण्यापेक्षा त्यांना औषधं घेणं सोपं वाटतं. असो…काय करणार सांगा..😃

बाकी ठिक?? आरोग्यासाठी चिंतलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थना …या पाण्यावरच्या अर्थहीन रेघोट्या असतात….. व्यायाम आणि डाएटला पर्याय नाही…चला..सुरु करा..😃

शुभेच्छा
💐💐💐

– सुमेध