लपवालपवी

बचना मेरे यारो…

लो मैं आ गया….😃

माझ्या येण्यानं आपला भ्रमनिरास झाला असेल…तरी मी माफी मागेन तुमची असं वाटतय….?😃 नो न् नेव्हर…सिन्स आय लव्ह यू…(एकतर्फी आहे…आय नो…तरीही..😃). कसे आहात ?? व्यायाम आणि डाएट सुरु आहे प्रत्यक्षात की फक्त विचारांच्या पातळीवरच मर्यादित आहे…??? ( हे ही नसे थोडके….😃). वार्धक्य रोखण्याचा तो एक आणि एकमेव राजमार्ग आहे….

जो वार्धक्य टाळतो… तो….अॉफकोर्स…. आजारी पडण्याच्या शक्यतेपासूनच कैक योजनं दूर असतो…..👍 (खतरनाक आहे रे हे….😃…)…येस हे खरं आहे. वार्धक्याची निशाणी शरीराच्या बाहयभागावर उमटण्याआधी… ती शरीराच्या आतून वर येते…तिचा मार्ग आतून वर असतो….😃 (डेंजर….)…ह्याचं भान असणं याचाच अर्थ डोळे उघडले की सकाळ असा होतो…अशा सोनेरी सकाळी…एक तर वार्धक्य टाळण्याचे प्रयत्न सुरु होतात …वा… रोखण्याचे..!! तुम्ही नेमकं काय करताय ते ठरवा.😃

केवळ वय किंवा वार्धक्य लपवण्यासाठी पुरुषांनी टी शर्ट घालू नये किंवा मिशा कापू नयेत. बायकांनी केवळ तेवढ्यासाठीच पंजाबी ड्रेस वा जिन्सचा आधार घेऊ नये. एक अकृत्रिम स्टाईल केवळ आणि केवळ स्टाईलसाठीच मारावी. लपवालपवीसाठी त्याचा उपयोग करु नये..😃 वय आणि वार्धक्याच्या लपवालपवीचं भान विकसित करण्याऐवजी डाएट आणि व्यायाम करावेत.

योग्यवेळी सुरु केलेल्या सातत्यपूर्ण डाएट आणि व्यायामानेच तारुण्य अबाधित राहील…मग काय ईश्टाईलच ईश्टाईल….पण सोपं नव्हे हे….😃😃

बाकी ठिक?? तारुण्याची आराधना सुरु करा…ताबडतोब !!!

शुभेच्छा

💐💐💐

– सुमेध