सोपं काय आहे?

काय मंडळी? बरं चाललय ना…😃 की नकोsss झालय?? 😃😃 …नाही ना?? मग सांगा पाहू…केलात का व्यायाम ?? करताय ना डाएट?? 😃 मी हा प्रश्न तुम्हाला लै वेळा विचारणार…कारण मी तुमच्यावर प्रेम करतो.. कोई शक? 😃 मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा नाहीये…!! ते मला माहितीये … येस !! माहितीये…!!!😃😃

व्यायाम आणि डाएट यावर चर्चा करणं, त्यावर काही तात्त्विक विवेचन करुन प्रचंड खल करण्यात उत्सुक असलेले माझे काही मित्र-मैत्रिणी आहेत…ते चर्चेत खूपच वाकबगार आहेत पण अंगापिंडानं लैच बाळसेदार😃…मी त्यांना शंभर वेळा सांगितलं… चर्चा बस्स करा… प्रत्यक्ष कृती करा .माझा आवेश 😃 बघून बिचारे करतात काहीतरी…पण तेरड्याचे रंग तीन दिवसही टिकत नाहीत….😃

शारिरीक व्यथा आणि आजारपण मानवी जीवनमान आकुंचित करते. हातात बक्कळ पैका आहे..पण तो डॉक्टरांच्या तिजोरीत नेमाने भरणारे बरेच महाभाग माझ्या पाहणीत आहेत. व्यायाम आणि डाएट फॉलो करण्यापेक्षा त्यांना औषधं घेणं सोपं वाटतं. असो…काय करणार सांगा..😃

बाकी ठिक?? आरोग्यासाठी चिंतलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थना …या पाण्यावरच्या अर्थहीन रेघोट्या असतात….. व्यायाम आणि डाएटला पर्याय नाही…चला..सुरु करा..😃

शुभेच्छा
💐💐💐

– सुमेध

Leave a comment